कोणीतरी असावं जीवनात

Started by pratikspiker, March 19, 2011, 04:23:27 PM

Previous topic - Next topic

pratikspiker


कोणीतरी असावे जीवनात
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारं
आपल्या खांद्यावर डोके टेकवून सगळं जग हिंडणार


कोणीतरी असावं जीवनात
रडताना आपली आसवं स्वताच्या आसवात बदलणारं
जगाचा सामना करण्यासाठी हिम्मत देणारं


कोणीतरी असावं जीवनात
आपल्या तोंडात प्रेमाने घास भरवणार
एक ज्यूस एकाचा स्ट्रो ने शेअर करणारं


कोणीतरी असावं जीवनात
काही चुकलं तर जीव बाहेर येईपर्यंत रागावणारं
आपल्या चुका समजून घेवून  त्या सुधारण्यासाठी संधी देणारं


कोणीतरी असावे जीवनात
तास न तास फोन वर गप्पा मारणारं
battery  लो झाली तरी दुसऱ्या कोणाच्या तरी मोबिले वरून कॉल करणारं


कोणीतरी असावं जीवनात
बाईक वर मागची सीट भरून काढणारं
कोणी बघेल हि भीती असली तरी बिंदास सगळं  जग हिंडणार.........
:) :) :) :) :) 


from Pratik

alonesachin