“एक वाट माझी असावी.”

Started by charudutta_090, March 21, 2011, 08:18:03 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"एक वाट माझी असावी."
इतक्या जग जंजाळात, एक दुनिया माझी असावी,
ज्यांच्यात,माझी आपली जिवलग,कायमची वसावी,
चेहेर्यावर ज्यांच्या,प्रसन्नता स्मितवून हसावी;
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी.

जिथे काव्य रसिकतेची,शिखर भरारी असावी,
जिथे वैचारिक पातळीची,सागरी खोली असावी,
ओळ पंक्तींच्या शब्दांची,जिथे पानगळ असावी,
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी.

निम्बुतरीत वृक्षाची थंड सावली असावी,
मोहरीत आंब्याची,सुगंधित दरवळ असावी,
झडल्या गुलमोहर पाकळ्यांची,केशरी रंगत असावी,
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी.

कोर्या करकरीत पानांची,बाकडी चढत असावी,
न संपणाऱ्या शायीची,लेखन-टाखी भर असावी,
विचार वादळाची,काव्य-स्फुरता असावी,
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

थंड गार हवेची,एक बसती खिडकी असावी,
तुषार ओल्यावणाऱ्या पावसाची, उडत असावी,
रसाळ लेखकाच्या लिखाणीची,हाती कादंबरी असावी,
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

शहरावणाऱ्या थंडीची एक उबदार शाल असावी,
टाकत्या मानेला,एक गुबगुबीत उशी असावी;
हुरपत पिणाऱ्या कॉफीची भरली बशी असावी,
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

सरातल्या मोत्यांची काही,विखरीत मणी असावी,
गझल शायरीची जुगलबंदी,जिंकत्या रणी असावी;
मोगरा माळीत गजर्याची,एक लहरती वेणी असावी,
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

दूर दूर पसरीत नभा कडी,डोंगरांची साखळ-दोर असावी,
हट्टी भावनांची खेळती,एक लाडिक पोर असावी;
गच्चीत पाळणी झुलताना,ढगी-आड एक चंद्रकोर असावी;
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

ओळी पानी उतरयाला,मनी गुलाबी बोच असावी,
प्रेमाची रंगत यायला,अश्रू-विरहाची टोच असावी,
काव्य धागा उसवायला,हृदय शालीस खोच असावी;
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

कविता शब्दांकित करायला ओठी,विड्याची लाली असावी,
ऐकणार्या श्रोत्या मंडळींच्या गाली,हसरी खळी असावी;
रचनीत कवित्वाची रूढी जपणारी,कोणी वाली असावी;
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,

हा प्रवास संपायला,वेळेची वेग-धाव असावी,
मैल दगडी दर्शवित पाटी,"कवी-गाव" असावी;
पैलतीर पार करण्यास,कागदीच नाव असावी;
खरंच,या जीवन महामार्गात,एक वाट माझी असावी,
चारुदत्त अघोर .(१३/३/११)