मिलनाची रात

Started by santoshi.world, March 23, 2011, 10:49:44 AM

Previous topic - Next topic

santoshi.world


मिलनाची रात

ठरवले नव्हते काही
कसे अचानकच हे घडले
अबोल्याने माझ्या तुला
अजूनच जवळ आणले.

होता तुझा सर्वांगावर स्पर्श
राग माझा वितळू लागला,
बाहुपाशात मग तुझ्याच
स्वत:ला हरवू लागला.

सुरु केलेस तुझे चाळे
मन माझे भटकवलेस,
भिडवून देहाला देह
कौमार्य कायमचे मिटवलेस. 

प्रेमाच्या वर्षावात जणू
दोघंही न्हाहून निघालो, 
चरणसीमा गाठताच
पुन्हा एकमेकांना बिलगलो.

तू अन मी पण तेव्हाच
कायमचे गळून पडले,
आपण हेच आता खूप
जवळचे वाटू लागले.

- संतोषी साळस्कर.

amoul


gathorat

अप्रतिम....खुपच छान शृंगारिक कविता.  :)

Amolshashi


Siddhesh Baji


nikhilesh.chitale

sundar ahe , pratyekala swatache te shkan athavayala lavanari kavita...
great...

nikhilesh

हर्षद कुंभार

वाव, इतकी सुंदर प्रणयी कविता आजतागायत कधीच पहिली नाही. खूपच छान खूप खूप आभारी आहे