माझ काय चुकलं?...(चारुदत्त अघोर.(२४/३/११)

Started by charudutta_090, March 23, 2011, 02:38:56 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
माझ काय चुकलं?
कोणी माझ्याशी बोललं,तर पोटात तुझ्या का दुखलं..
मला जेव्हां मोकळं तू सोडलं,तेव्हांच तू मला मुकलं,
आता त्या रोपट्याला का पाणी घालतेस जे कधीच सुकलं..
खरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं?

तू तेव्हां महागलीस,जेव्हां मी सर्वस्व माझं विकलं,
एकत्रित बसायच्या आतंच,ते सौन्सार वाहन हुकलं;
प्रेम मैदान तू हरलीस,जे तुला वाटलं जिंकलं,
खरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं?

आशेनं वाटलं कि,जीवन गाड सज्ज होऊन जुंपलं,
एकदा तर अंधारात,अनुभवायचं मी चांदणं जे होतं शिंपलं,
आता किती अश्रू गाळतेस,तेव्हां कोणतं गं घोडं शिंकलं.,
खरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं?

ज्या जगाची स्वप्नं पाहीलीत,कोणतं त्यातलं टिकलं.,
मनधरण्या का करतेस,तेव्हां 'मी'पण जराही नाही वाकलं,
हे विस्तारित बाहू खुले होते,जर असतं थोडं झुकलं,
खरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं?

सगळं तुझंच होतं,जर मानलं असतं सगळं आपलं,
प्रेमासारख्या ओल्या दवाला,तू मोजून नापलं;
जीर्ण झाल्यावर आलीस,जेव्हां हे पान अर्ध पिकलं,
खरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं?

आजीवन सहवासाला,तू मैलाने आखलं,
भावनिक गोडी रसाला,थेंबभर हि नाही चाखलं,
शिळ्या पोळीस गर्मी नाही,जरी कितीही तूप माखलं;
खरंच सांग आता,यात माझं गं काय चुकलं?
चारुदत्त अघोर.(२४/३/११)