खरं स्वातंत्र्य

Started by बाळासाहेब तानवडे, March 24, 2011, 11:36:29 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

खरं स्वातंत्र्य
खुलं आकाश , मोकळी हवा.
विहरण हवं तिथं आणि हवं तेंव्हा.
कधी गाती गोड गाणी करून थवे.
गुज गोष्टी करती मुक्त वाऱ्या सवे.

खाणं पिणं जिथं मिळेल तिथं.
उद्याची काळजी चिंता कुठं?
स्वतःच्या मस्तीत मस्त जगणं.
कोणाची फिकीर ना पर्वा करणं.

मालक असती स्वतःच्या मर्जीचे.
ना आदेश देती ना मानती कोणाचे.
स्वातंत्र्य असतं हर तऱ्हेचं.
बंधन नसतं तसू भरच.

अरे माणसा बुद्धीचा तुला गर्व भारी.
शोध नवा लावशी रोज एक तरी.
पण असे स्वातंत्र्य तुला रे कुठे?
जे एका छोटयाश्या खगास भेटे.

कवी :  बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब  तानवडे – १४/०३/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
प्रतिक्रीया अपेक्षित