छत्रपती...................

Started by दिगंबर कोटकर, March 28, 2011, 10:32:49 AM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर

संधी दया मग सोने निखारेल,  ह्या तरुणाईच्या जोशातुन,  शोधून आणतील तल्लम रेशीम,  त्या सुरवंताच्या कोशातुन.......     कुठवर तुम्ही शोधत बसणार,  कुस त्या शिवाच्या आईची,  प्रत्येक घरात जन्मलेल छत्रपती,  गरज फक्त हो जीजाऊची.........     कुठवर तुम्ही वाट हो बघणार,  त्या शुरवीराच्या जन्माची,  जन्म्लेल्याना संधी दया मग,  भासेल का ? उणीव राजांची............     एक नाही अनेक छत्रपती,  निपजतिल ह्या मराठमोळ्या मातीतून,  जय भवानी - जय  शिवाजी नाद येईल,  ह्या मराठी निधड्या छातीतून.........     हि जात मराठी, निडर मनाची,  तमा न यांना मरणाची,  जन्मल्या नंतर लगेच करतात,  तयारी स्वत:च्या सरणाची..........                  दिगंबर