तुळशी वृंदावन

Started by gojiree, April 01, 2011, 11:35:51 PM

Previous topic - Next topic

gojiree

जीवापाड जपते हे सौभाग्याचं लेणं
अंगणी शोभते माझ्या तुळशी वृंदावन

किती सडे- रांगोळ्या नि किती दीपमाळा
वृंदावना येतो गंध तुळशीचा ओला
सर्वांनाच लाभले हे मोलाचे आंदण
अंगणी शोभते माझ्या तुळशी वृंदावन

घरातल्या लेकी सुना, लहान नि थोर
खोपा, नऊवारी आणि भाळी चंद्रकोर
पुजीताना वाजतात हिरवी काकणं
अंगणी शोभते माझ्या तुळशी वृंदावन

शांत तेवते दिव्याची ज्योत वृंदावनी
हळदी- कुंकवाचे लेप चारही बाजुंनी
तीर्थाने भिजले तिचे एक-एक पान
अंगणी शोभते माझ्या तुळशी वृंदावन

राउळाहून ठरे कळसच मोठा
देव्हा-याहून पवित्र तुळशीचा कट्टा
महादेवा आधी होते नंदीला वंदन
अंगणी शोभते माझ्या तुळशी वृंदावन

-गोजिरी

amoul

khupach chhan aahe kavita!! vachatana ekprakarachi lay yete !! mast

gojiree