"तो पुरुष आहे म्हणूनच..."

Started by charudutta_090, April 03, 2011, 09:16:40 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई.
"तो पुरुष आहे म्हणूनच..."
तो नभ आहे म्हणूनच, हि पृथ्वी आहे,
समुद्र आहे म्हणूनच, नदीला कुशी आहे;
नाही तर कुठे दोघींना सुरक्षा इतरत्र आहे;
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

चांदण्याची लखलखाट आहे,कारण चंद्र आहे,
तो नसता तर, नुसताच अंधार आहे;
त्याच्या मुळेच काळोखातही प्रकश सर्वत्र आहे;
अर्थात तो पुरुष आहे,म्हणूनच पावित्र्य आहे...!

आज सृष्ठीला,निसर्ग हाच आधार आहे;
पानगळीला,श्रावाणा मूळेच गांधार आहे;
तो दिवस असल्यानीच निश्चिंत, रात्र आहे;
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

ती हवा आहे कारण, तो वारा आहे,
पाणी लहर आहे ,कारण फुटता झरा आहे,
मैत्री आहे कारण,जपणारा मित्र आहे;
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

अंगी वीरता आहे कारण,तो वीर आहे,
अस्वस्थतेला शांती आहे,कारण तो धीर आहे;
घराण्याला वौंषत्व आहे,कारण तो पुत्र आहे;
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

आज मजले,इमारती आहे, कारण तो पाया आहे,
कपाळी कुंकू आहे,कारण त्याचा धनी तो राया आहे;
आज ती तेजीत किरणं आहे,कारण तो सूर्य मात्र आहे;
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

संगीत स्वराला,आवाजामुळेच झंकार आहे,
ध्यानधारणित साधना आहे,कारण ओंकार आहे;
तो आहे म्हणूनच, आज स्त्रीचे वजनीत चारित्र्य आहे;
अर्थात पुरुष तो आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

आज सृष्ठी आहे कारण, तो जीव आहे,
मुक्ती आहे कारण, तो शिव आहे;
उरत्या इच्छेला, कुठे थारा अन्यत्र आहे,
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!

शक्तीची विलीनता आहे, कारण शिवाचं शिवत्व आहे,
सौन्साराची चलनता आहे,कारण जीवाचं जीवत्व आहे;
गायत्रीची पवित्रता आहे,कारण तो यज्ञ व त्याचं अग्निहोत्र्य आहे,
अर्थात तो पुरुष आहे, म्हणूनच पावित्र्य आहे...!
चारुदत्त अघोर(३१/३/११)