संकल्प सिद्धी

Started by बाळासाहेब तानवडे, April 04, 2011, 12:26:08 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

संकल्प सिद्धी

मिळेल जीवनात  खात्रीने जय.
पहिलं पक्क असावं  अंतिम ध्येय.

स्वप्नरंजनातच न  व्हावं चकित.
कागदावर ध्येयाच  होऊ दे लिखित.

नवी कल्पना नित्य  लिखितात भरु दे.
अंतिम ध्येयाला  परिपूर्णत्व येऊ दे.

सार्‍या  कल्पनांची आता योजना बनु दे.
प्राथमिकता  महत्ते अनुक्रम ठरू दे.

नुसत्या ध्येयाला  ना आरंभ ना शेवट.
पूर्णत्वाची समय  सीमा असावी चिवट.

आता ना कशाची वाट  पहावी.
तत्काळ कार्याला  सुरुवात करावी.

एक ही दिन ना  व्यर्थ असावा.
अंतिम ध्येय  प्राप्तीतच अर्थ दिसावा.

लिखित ध्येयाच  महत्व सर्वास कळावं.
मनाजोग यश सर्वास  मिळावं.

कवी :  बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब  तानवडे – ०४/०४/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
प्रतिक्रीया अपेक्षित