गोष्टी-दत्त गीत

Started by विक्रांत, February 12, 2025, 04:26:49 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

गोष्टी
*****
देह पडणारा पडेल शेवटी
सरतील यत्न साऱ्या आटाआटी

असून नसून उगा राहायचे
कौशल्य युक्तीचे कुणा कळायचे

अडकला देह अडकले मन
जन्म जन्मातून जातसे फिरून

नवी कथा असे नव्या पानावर
अंतहीन रात्र  गोष्टी गोष्टीवर

राजा राणी मंत्री आशा आस वैरी
सुख सांडलेली  हळहळ उरी

वाहतो विक्रांत वाहत्या पाण्यात
दत्त दिगंबरा मागतोय हात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘ 🕉� -