तुझ्या माझ्या वाटा : शर्वरी

Started by sharvari, April 06, 2011, 07:49:13 PM

Previous topic - Next topic

sharvari

तुझ्यासाठी फक्त दोन मिनिटांचा खेळ होतो
कधी कधी भर उन्हात पाऊस बरसून जातो
तुझे शब्द भावना माझ्या ओल्या करून जातात
आठवणींचे सरी थेंब पापण्या भिजवून जातात
आठवतात  का तुला कधी शब्द तुझे आणि आपले क्षण?
चुकून कधी आठवणींनी भरून येते का तुझे मन?
काटे फक्त माझ्यासाठी, चुका फक्त माझ्याच होत्या?
मागे वळून पहिले तर जखमा माझ्या ओल्या होत्या.
रक्त कुणाचे किती वाहिले, कुणाच्या जखमा ओल्या होत्या?
खेळाचा निकाल एवढाच होता तुझ्या माझ्या वाटा वेगळ्या होत्या.