"शब्द"....चारुदत्त अघोर(६/४/११)

Started by charudutta_090, April 06, 2011, 09:08:07 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
"शब्द"....चारुदत्त अघोर(६/४/११)
शब्द शब्द शब्द,किती हे शब्द,
आलटून पालटून करतात,सर्वांना स्तब्ध ;
कविता रुपी सजून, करतात मंत्र मुग्ध,
शब्द शब्द शब्द,किती हे शब्द..!

स्वर बनून रंगतात,शुद्ध-निशुद्ध,
कडू बनून कधी करतात,ऐकणार्याला बेशुद्ध;
आपण मात्र राहतात,वेगळे खुद्द,
शब्द शब्द शब्द,किती हे शब्द..!

कुठवर यांची लांबी, कुठवर हद्द,
विचार केला तरी, वाटतं हतबद्ध;
मूळ यांचे शोधावे,धरावी हि जिद्द,
शब्द शब्द शब्द,किती हे शब्द..!

मर्जी असली तर मान्य,नाही तर रद्द,
कधी काटेरी तर कधी धारी दुग्ध;
मोकळे कधी तर,केव्हां स्वर बद्ध;
शब्द शब्द शब्द,किती हे शब्द..!

कान्हा,मात्र,रुकार,सगळ्यांनीच बंध,
यांच्या अलंकारीक्तेचा,थोड्यांनाच गंध;
कधी श्लोकरूपी पवित्र,तर कधी विषारी अशुद्ध;
शब्द शब्द शब्द,किती हे शब्द..!
चारुदत्त अघोर(६/४/११)