तिची चाहूल...

Started by nphargude, April 07, 2011, 12:10:44 AM

Previous topic - Next topic

nphargude

हळुवार तिची चाहूल लागली,
मनाला ती पार भिडून गेली.
मागे वळून तिने पाहताना,
तिची प्रतिमा हृदयात कोरली गेली.
जीवाला या आता तिचेच वेंड लागले,
तिच्या आठवणीने सारे मन आनंदाने थयथय नाचू लागले.
डोळ्यासमोर आता फक्त तीच दिसते,
बाकी सगळे विसरले जाते.
तिच्या नजरेत मी स्वताला भिडू पाहतो,
पण समोर जाताचक्षणी सगळा त्राण गळतो.
न जाणो वेळ केंव्हा येईल विचारेन तिला होशील का माझी,
कदाचित सगळेच राहील बाजूला दुसराच कोणीतरी मारेल बाजी.
पण काही होवो माझे तिच्यावर निस्सीम प्रेम आहे,
उगीच कशाला नको ते प्रश्न करायचे उभे.
प्रेमाला काही मर्यादा नसते हे माहित आहे खास,
जर खरेच तिला मी आवडत असेन तर तिचा इरादा बदलणार नाही हा माझा पक्का विश्वास.- nitin hargude...kop.