“एकट पाखरू….!”चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, April 09, 2011, 08:42:13 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं..
"एकट पाखरू....!"
अजाण,नव्यापणी उडतं मी पाखरू,
त्यांनी दिलेलं जीवन कसं नाकारू;
दिसती हिरवळ वाटते,खूप हवी,
सगळी दुनियाच जशी,आहे नवी,
आजच घरटी जन्मून,उघडली पापणी,
नाही कोणीच भोवती,जणू एकलेपणाची चाचणी,
आजूबाजूस फक्त काही घरकुली काटे,
जे पार करून शोधायचे उडण्याचे फाटे;
नखभर पोटास,भुकेला चार दाणे,
कानी न समजणारे मित्रांचे गाणे;
अर्ध खुल्या पंखी,उडायची आस,
काहीच माहित नाही,कोणत्या ऋतूचा मास,
फडफड पंखी झाडून, थोडा वीत भर उडतोय,
तळी घरट्यातून, वर कुंपणी चढतोय,
कोवळ्या नजरी दिसतंय,अवेधीत पसरलं जग,
कोणत्या दिशेस फडकावून उडावं समजेना मग;
वाटलं उडावं बेधुंद,म्हणून ताणून उघडले पंख,
जरा दुर्लक्षित केला पडता, इतर पाखरांचा डंख;
मलाही मन आहे जे उड म्हणतंय थरारी,
मोहून निसर्गी घेतली,उंच पहिली भरारी;
मी राजाच जणू सगळ्या, किडा-मुंगी-मानवा वरती,
थंड हवा अन्गवून विसावलो, एका कठड्या वरती;
काही माझीच जात मित्र होते बाजूस दाणे टिपत,
कोण एक मैत्रीरूप आली,घेऊन दाणा वेचत;
तिच्या चिव चीविला,काही तर अर्थ होता,
ती कळवळून सांगत होती,जो मला समजत नव्हता,
मी भाबड्या नजरी,दिलेला दाणा चोची टिपला,
शहारल्या पंखी लाजून,तिने पुढला प्रवास जुंपला;
तो दाणा गिळायच्या आताच, ती आगळ्या दिशेस उडाली,
माझी नजर वेध घेत,तिच्या नजरे-आडेस्तोवर बुडाली;
कोण होती ती या विचारी,गुंतवून हरपलो,
एका गोड खीन्नतेत,माझ्या घरटी परतलो;
त्या चीवचीविनी शिकवली मला माझी बोली,
काल सुकली जीभ,आज मधावून झाली ओली;
कशी बशी रात्र उलटवून,स्वागतली पहाट,
पुन्हा त्या कठाडी गेलो,ती पहाट होती वाट;
आज मात्र मी चीवचीवलो,काही संकेत ती भासली,
मला पंखी कुरवाळत तिनं,अंगी चोच घासली;
नजर तिची पाणावून,माझ्या नजरी रोखावली,
माझी चोच पुढवून,तिच्या चोची टोकावली;
दिस,मास,वर्ष,पालटून रोज त्या कठडी भेटलो,
एक घरकुल आपलं असावं या निर्णयी थेटलो;
दुसर्या दिवशी काड्या जमवून,निवडला कोपरा कठडी,
ती नाही आली वाटलं, येत असेल घेऊन नित्य गाठोडी;
माझं घरट तयार झालं,वाटलं खुश होईल ती बघून थाट,
पण ती नाही आली, डोळी तेल टाकून मी बघितली वाट;
घरट माझं सुनावलं,त्याला राहिला न कोणीच वाली,
काळ लोटला, कंठ घोटला,पण ती नाही आली;
थेंब नाही,दाणा नाही,उरली फक्त, ती येण्याची आस,
थकल्या पंखी,गळून पडलोय,सुटावा तिच्या पंखी श्वास.
काय माझं चुकलं,न तिनं सांगितलं,न केला कुठला आरोप,
चुकून तुमच्या खिडकीत ती आली,मी वाट पाहतोय एवढाच द्या निरोप..!!
चारुदत्त अघोर. (२७/३/११)