वाटतं,असंच मागे घडलं होतं,(चारुदत्त अघोर.)

Started by charudutta_090, April 11, 2011, 08:07:47 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
वाटतं,असंच मागे घडलं होतं....!

कळत नाही,पण दृश्य हेच होतं,
अगदी,बोलणार्याचं वाक्य हि तेच होतं,
कोण जाणे असं का होतं;
कि वाटतं, असंच मागे घडलं होतं,

आठवलं तरी,आठवत नसतं,
नुसतच,मन फक्त ठाम असतं;
बेजार डोकं,कातवल्या जातं;
कि वाटतं,असंच मागे घडलं होतं,

माणसं वेगळी,तरी तीच भासवतं,
विचार करून करून,बुद्धी घासवतं;
अगदी तसंच सगळं,प्रसंगल होतं;
कि वाटतं,असंच मागे घडलं होतं,

काहीच साम्य नसून असं का वाटतं,
ओलावून डोळे,दाटवून कंठतं ;
घडल्या प्रसंगी,मन उडून बसतं;
कि वाटतं,असंच मागे घडलं होतं,

आपल्या हालचालीतही साम्य असतं,
बोल्या वाक्यात गम्य हि तेच असतं,
अगदी नव्या व्यक्तीशी हि मन जुनावतं;
कि वाटतं, असंच मागे घडलं होतं,

कोणत्या अदृश्य तारी,असं जुळतं,
कि मागलच सगळं वाटतं मिळतं;
परक्या माणसाशी हि तरावतं नातं;
कि वाटतं, असंच मागे घडलं होतं,

नव्या जागीही पहिलीच घरं जागवतं,
काळ लोटला तरि,झटक्यात मागावतं;
वर्तमान जागीच,जुनं गाव गावतं;
कि वाटतं, असंच मागे घडलं होतं,

नुसता भास असतो कि खरच असं होतं,
नवी माणसं असतात कि,तेच जुनं गोतं;
कळत नाही चाळावं,कि बांधावं हे पोतं;
कि वाटतं, असंच मागे घडलं होतं,
चारुदत्त अघोर(३१/३/११)