"वाट....!" चारुदत्त अघोर.©(११/४/११)

Started by charudutta_090, April 12, 2011, 04:48:40 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई.
"वाट....!" चारुदत्त अघोर.©(११/४/११)

तू सांगितलं तिथं मी आलो,
घातल्या शपथेला,भारावून गेलो,
एक छोटा क्षणही वाटतो अफाट;
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

किती आळवून मला,सांगितलं तू येतेस,
माझ्या काळजाचा,ठोकाच तू चुकवतेस;
या प्रेम जीवनाला जसा,लागला आहे नाट,
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

वाटते सुकी,हि पसरली हिरवळ,
फुटली पालवीही,जशी झडती पानगळ;
आतुर मी थकूनही,तुझ्या आसी ताठ;
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

विसरलीस का या,तूच दाखवल्या डोंगर कडा,
मुठीत मला श्वासवलेला,ओल्या मातीचा गंधित सडा;
बहरलेला तुझ्या संगती,जीवन होतय भुई सपाट;
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

तुझ्या एका स्पर्शानच,चेतना ओलावायची,
अंगी मोहर बहरायचा,जर कानी बोलायची;
ते बरोबरीचे क्षण,जशी मन-सागरी उत्तुंग लाट;
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

किती ह्या उसळत्या,भावना दाबायच्या,
कशा या बहरल्या,वेळा उबवायच्या;
उतावळ्या मन-धरणाला,कसा बांधायचा पाट
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

कानी भासतात तुझे,ऐकवले गाणे,
तोंडी खारटतात,ते पुडीतले खाल्ले दाणे;
त्या दाण्यांपुढे,फिक्क आज भरलं ताट,
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.

धावत्या जीवनाची,जशी मंदावातेय गती,
जागृत अवस्थी,जणू गुंगावतेय मती;
कसं चालवू हे जाम झालं,गाडं रहाट;
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट

माझ्या हातचा गजरा,केशी एकदा बहरव,
तुझ्या सावली निजवून,तुझी छाया पसरव;
स्वप्नी तू,विचारी तू,तुझ्याच मांडी जागावी पहाट;
कुठे गं तू,कसली जीवघेणी,हि बघायची वाट.
चारुदत्त अघोर.©(११/४/११)

.