खात्री आहे मला..

Started by Rani27, April 13, 2011, 12:45:33 AM

Previous topic - Next topic

Rani27

वेळ नसतो हल्ली तुझ्याकडे माझ्यासाठी
कामच हल्ली तुझी प्रिया आहे
पण मग आठवतात मला ते क्षण 
जेव्हा तू होतास फक्त माझा अन मी फक्त तुझी
कधीच नव्हतास तू दूर नसेल जरी मी जवळ तरी होतास फक्त माझाच
प्रेम काय असत ते मी विसरले होते
होतास तूच फक्त तेव्हा सांगायला मला
प्रेम कसे असते दाखवायला मला
वाटते कधी समजत नाहीच तुला
समजूनही जेव्हा बनवतोस बहाणा
पोळलोय तर खूप दोघेही आपण
जवळ आलो कदाचित त्यामुळेच पण
पण तरीही वाटत कधी तू समजून घेशील
शब्दांपलीकडे पण काही असते ते जाणून घेशील
कधी तरी म्हणशील....
.... जुन्या जखमा विसरलोय मी
....  आता बस हवाय मला थंडावा तुझ्या स्पर्शाचा
....  गंध हवाय रोज तुझ्या जवळ असण्याचा
....  हो हवियेस मला तू फक्त आतासाठीच नाही तर आयुष्यभरासाठी
.... प्रत्येक स्वप्न मी परत पाहीन आणि त्यात फक्त तूच अशील
खात्री आहे मला कधीतरी म्हणशील .....

........ Rani

santoshi.world

apratim ............ hi kavita hi khup khup khup avadali ......... agadi mazya manatalech janu varnan keleyas .......... maza to pan halli asach vagatoy mazyashi :(