रात्र नाहू दे....!!! चारुदत्त अघोर.(८/४/११)

Started by charudutta_090, April 13, 2011, 08:58:11 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
रात्र नाहू दे....!!! चारुदत्त अघोर.(८/४/११)
ह्या हाथ तळव्यान, तुझे डोळे झाकू दे,
अधर फुलपाखरी पापण्या,हलक्या फडकू दे;
ह्या रात्रीचा गंध,मंद दरवळू दे,
तुझी नागमोडी बट, एकदा कुर्वळू दे;
तुझ्या कपाळी चांदण टिकली,जरा चमकू दे,
काळ्या रात्री,तुझी शुभ्रता अभ्रकी दमकू दे;
टप्पोर्या हरणी डोळ्यांना,धारी काजळू दे,
नाजूक सूरही मानेला,ओशळून लाजळू दे;
झाकल्या पदरी उराला,रसावून डवलू दे,
लेणीत मूर्ती कंबरेला,लच्कून कवलू दे;
बांधल्या पैन्जणाला,तुझ्या पाऊली खुलू दे,
मादक झुळुकी हवेत,हा पदर झुलू दे;
तुझी हळुवार कुजबुज,कानी पिसवू दे,
माझा अटकला श्वास,प्रेम धागी उसवू दे;
दव थेंबांना कपाळी,थोडं अझून ओलावू दे,
आतुर या क्षणांना,आज पाहुणचारी बोलावू दे;
तुला आड ठेवत्या केस-पडद्याला,आज हटवू दे,
माझ्या बंधित रसाळ मदनाला,आज सुटवू दे;
आज चार डोळ्यांना एकमेका नजरी,आत पाहू दे,
निळ्या नभी चंद्रानी,हि दुधाळ रात्र नाहू दे....!!!
चारुदत्त अघोर.(८/४/११)