जाता जाता-

Started by nphargude, April 14, 2011, 12:33:08 AM

Previous topic - Next topic

nphargude

जाता जाता-
आयुष्याच्या वाटेवरून जाता जाता मागे वळून पाहावेसे   वाटते.
पुढे  जाता जाता, थोडे थांबावेसे वाटते.
इथवर आलो याचे   कुतुहूल वाटते, जाता जाता थोडे स्वस्थ बसावेसे वाटते.
क्षणिक   विश्रांती घ्यावीशी वाटते, जाता जाता थोडी पाठ टेकवीशी वाटते.
थांबून   जरा आजवरच्या प्रवासाचे पान उलगडावे वाटते, जाता जाता त्याबद्दल विचार   करावेसे वाटते.
भौतिक सुखासाठी चाललेल्या वाटेवरती पाउल कसे पडले,   जाता जाता या चे मनात काहूर मात्र वाजते.
पण वेळ होईल म्हणून पुन्हा   एकदा उठावेच लागते, जाता जाता हेच दुख अंगाशी बाळगत चालावेच लागते, चालावेच   लागते.
- नितीन हरगुडे. kolhapur.