कविता

Started by Rani27, April 14, 2011, 02:09:37 AM

Previous topic - Next topic

Rani27

ओठांची भाषा डोळ्यांनी जाणली
संवेदना दूर दूर राहिली
कवितेला सुरुवात तर केली
शेवटची ओळ मात्र राहूनच गेली
कविता लिहिता लिहिताच पुरेवाट झाली
हे लिहायचं, ते राहिलंय करता करता शब्दच हरवलीत
इथे 'त' तर तिथे 'म'
इथे 'प' तर तिथे 'य'
जुळवता  जुळवता नाकी नऊ आलीत
वाटल एकदा कविताच फाडून टाकावी
पण कविता कसली फाडतेय
पानच फाडावी लागली
पानांच्या तुकड्यांतून कविता बोलू लागली
आयुष्यात तुला काहीच जमल नाही म्हणून हसायला लागली ...........

- सुषमा

प्रिया...

Chhan ahe... Gud one!

santoshi.world

zakkkkkkkkaaaas kavita dear :) .........
पानांच्या तुकड्यांतून कविता बोलू लागली
आयुष्यात तुला काहीच जमल नाही म्हणून हसायला लागली ....... mazya babatit hi nehami asech hote :P

amoul

Khupach mast kavita aahe !!!! pane fatun jaatat pan apurya kaviteche shabd matr chhalat rahatat.