कविता

Started by stupid.phoenix, April 15, 2011, 04:46:31 PM

Previous topic - Next topic

stupid.phoenix

सोन्याच्या शोधात भटकला तू खुप,
चकाकीचे,झळाळीचे तूला अप्रूप.
झाकोळून डोळे तूझे गेले त्या तेजाने,
अंध केले तुला स्वत: प्रकाशाने.
स्वार्थाचा डोंब मनी उसळला,
क्षणात तू सर्व विसरला.
सावरले कुणी,कसे,कोठून न जाणे,
अंध डोळ्यांनी दिधले अंर्तचक्षुंचे लेणे.
टाकून खाली तो हव्यास तू परतला,
प्रेमाच्या ओढीने एकान्त तळमळला.
स्मृतीपटलांवर वेळेची हळुच जळमटे चढली,
पण अश्रुंच्या पाण्याने ती पुन्हा लख्ख झाली.
क्रोध,द्वेश,अन्याय,उद्वेगाला तू सरावला,
प्रत्येक क्षणी जिव्हाळ्याला दूरावला.
पाश सारे तोडून एकटाच का निघतोस वेड्‌या,
जाशील तिथे जखडून ठेवतील पुन्हा ह्याच बेड्‌या.....