‘चंद्र’ डागाळलेला बरा

Started by aryanbhv, April 17, 2011, 05:36:49 PM

Previous topic - Next topic

aryanbhv

विषय हा टाळलेला बरा,अन्य हाताळलेला बरा ॥
आठवांच्या फुलांतील 'तो'मोगरा जाळलेला बरा ॥
हट्ट का उत्तराचा उगा?प्रश्न रेंगाळलेला बरा ॥
विश्व खोटे जरी भोवती,शब्द मी पाळलेला बरा ॥
लावु दे पेच त्यांनाच, मीदोर गुंडाळलेला बरा ॥
हौस ना थांबण्याची मला,पाय भेगाळलेला बरा ॥
मिरव 'सौभाग्य' तू आपुले,'चंद्र' डागाळलेला बरा ॥

santoshi.world