ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे

Started by amoul, April 18, 2011, 09:38:26 AM

Previous topic - Next topic

amoul

ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.
शब्द माझा......नकळत माझ्या,
तुझा कधी रे सांग झाला,
भिजवून नभ हा खट्याळ मला,
तुझ्या समीप कधी रे आला.
हृदयातूनी, नेत्रातूनी, गात्रातुनी प्रित पाझरे.
ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.

सावलीची आस वेडी,
वेड्या मनास लावी गोडी,
आणि बघ ना तू नसताना,
वारा मुजोर काढी खोडी.
मन क्षण क्षण होते कावरे बावरे.
ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.

स्वप्नात कधी, सत्यात कधी,
कधी तू असताना, नसताना कधी,
केवळ आठवांनी मन मोहरे.
वाटते कि तू पाहिले, तू स्पर्शले, तू छेडीला मला.
मी फुलते, झंकारते.................
मी हासते उगाचच, मन होते लाजरे.
ना सावरे ना आवरे, तुजवाचुनी मन बावरे.

....अमोल