सये येउनी जा...

Started by Honey, April 19, 2011, 07:00:22 PM

Previous topic - Next topic

Honey

कधी अवचित सये सामोरी येउनी जा
एकदाच मनभर अशी तू मला भेटुनी जा   

विजेसारख असं तुझ हे येण 
अन मला मोहवूनी निमिषात लुप्त होण 
तरी तेजाळल रूप तुझं क्षणभरासाठी दाखवुनी जा     

येताना कधी सोबत म्हणून पावसालाहि  घेऊन ये 
दवातल्या फुलापरी भीजल रूप तुझं,मला साठवू दे   
मनातल्या अंदाजांचा सत्याशी सामना करून देऊनी जा     

स्पर्शात माझ्या तू लाजून मोहरावे 
त्या राक्तीमात हरवून मी माझा न राहावे 
असा गोड लाजरा प्रीतीचा मुग्ध उखाणा घालूनी जा     

कशी सहजच रुसतेस,कधी सहजच हसतेस 
कसा ग लाडिक नखर्यात माझा जीव गुंतवतेस 
कुठून शिकलीस असं वेड लावण ते कानात सांगुनी जा     

आता नुरले अवधान अन सरले भानही 
बघ ! कसा येतोय हा पूर  चांदण्यांचा आतूनही 
कधी अवघ तुझं नक्षत्रवैभव माझ्यावर उधळूनी जा     

Honey