smile please ........... ok !! "click "

Started by amoul, April 20, 2011, 05:01:58 PM

Previous topic - Next topic

amoul

तो तसा धीट होता, नेहमीच असायचा.
seriousness  वागण्यात होताच,पण मात्र गोड हसायचा.
नेमकं त्या दिवशी मी त्याला रडताना पाहिलं,
पण आलेलं पाणीही फार काळ डोळ्यात नाही राहिलं.
ती वेळ तशी चांगलीच होती, त्याच्या बाळाच्या नामकरण विधीची,
पण नक्कीच त्यावेळी त्याला, गोष्ट आठवली असेल काही आधीची.

झालं हेच होतं कि, एक वर्षापूर्वी त्याचे वडील वारले होते,
काही महिन्यापूर्वीच तर त्याने स्वतःला त्यातून सावरले होते,
वडील असताना जवाबदार्याचं ओझं त्याच्यावर नव्हतं,
पण त्यानंतर मात्र त्याने स्वतःला parties , pickniks मधून आवरले होते.
काहीच तर माहित नव्हतं त्याला, सगळ्या जवाबदारया नव्या होत्या,
कोणीच नव्हतं त्याचवेळी सांगायला त्या गोष्टी, ज्या नेमक्या सांगायला हव्या होत्या.
आई तर त्याच दुखात दिनरात दिसायची,
ते tension कमी होतं कि काय म्हणून लग्नाच्या वयातली बहिण समोर असायची.

पण एके दिवशी अचानक आनंदाचा पाऊस पडला,
सुखावले सारे घरचे आणि तोही जो होता दुखाने पिडला.
ज्या गोष्टीसाठी अपार डॉक्टर्स, मेहनत एवढाच काय नवस केले होते,
सारं काही फळाला आलेलं, त्याच्या बायकोला दिवस गेले होते.
वडील वारल्याच दुख तर होतच मनात तसंच,
पण नव्या आनंदाने बदलून गेलं सारंच.
काळाच्या नियमाप्रमाणे दुखाचा होऊ लागला विसर,
तिला दिवस गेल्यानेच होता हा सारा असर.

हळू हळू काळ ओसरला नवा बाळ जन्मा आला,
तो सर्वांना सांगत होता मला मुलगा झाला.
हळूच कोणी त्याला म्हणाला तुझाच बाबा पुन्हा जन्मला.
बारश्याच्या दिवशी गाऱ्हाणे घालताना देवाला,
मनाचा हळवा कोपरा पुन्हा हेलावला.
तो नकळत बोलून गेला "बाबा तुम्ही हवे होते",
झोपलेल्या बाळाने तेव्हाच नेमके "ट्या ट्या" केले होते.
कोणीतरी म्हणालं  ऐकून सारं हे,
अरे बघ पुन्हा बाबाच आला आहे.
डोळ्यात आलेला थेंबही त्याने लगेच पुसला,
मी मात्र तो क्षण नेमका तेव्हाच टिपला.

smile please ........... ok !!  "click "

..अमोल

:) ... विजेंद्र ढगे ... :)

छान आहे कविता...... मस्त मस्त

MK ADMIN

PRASAD NADKARNI

smita kardak

chaan

gaurig