शरदाचे चांदणे

Started by kavitabodas, April 21, 2011, 05:05:40 PM

Previous topic - Next topic

kavitabodas

धुंद त्या रात्री पडले शरदाचे चांदणे
  भरला उरी सुगंध सख्या तुझिया कारणे
 
  मन माझे शोधीत तुजला
  फिरले असे दूर वरती
  भेटलास वळणावरती
  जीवलगा असा एकांती
 
  मन माझे चंचल इतुके
  शोधते नजर भिरभिरते
  वय इतुके अल्लड कसले
  तू नसता बघ हिरमुसते