पुढचा क्षण कसा येईल…?©चारुदत्त अघोर(२१/४/११)

Started by charudutta_090, April 22, 2011, 11:43:35 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
पुढचा क्षण कसा येईल...?©चारुदत्त अघोर(२१/४/११)
क्षण भंगुर जीवन हे,तरी किती हाव,
लपून साधते नियती,आपलाच डाव;
चालून घेऊन जाते,नकळत स्वतः सहित,
पुढचा क्षण कसा येईल,कोणास काय माहित...!

किती जमवा जमाव करायची,नाही ठाऊक,
प्रत्येक वस्तू करिता, होतं मन भाऊक;
उरत काही नाही शेवटी, ठाम असं रहित;
पुढचा क्षण कसा येईल,कोणास काय माहित...!

भ्रमात सदैव राहून ,माणूस जमवतो पसारा,
एक हि गोष्ट देत नाही,कायमचा आसरा;
तरी अमिशून धरतो, माणूस सर्व गृहीत;
पुढचा क्षण कसा येईल,कोणास काय माहित...!

आपल्याच विश्वात धुंद असतो,न राहता सतर्क,
काहीच हाथी नसून,केवढे काढतो तर्क-वितर्क;
अजाण असूनही देतो, खात्रीने सर्व ग्वाहीत;
पुढचा क्षण कसा येईल,कोणास काय माहित...!

काहीच दृष्टीस नसून, केवढा पुढचा विश्वास,
पुढचा श्वास आहे कि नाही, तरी सुटकेचा निश्वास;
आपलंच समजतो सर्वांना,जे कधीच आपले नाहीत;
पुढचा क्षण कसा येईल,कोणास काय माहित...!

जागा हो मानवा, बसण्या आत नियतीची थापड,
उघड आंतरिक डोळे,काढ डोळ्यावरची झापड,
त्याला स्मरणी ठेऊन,जा अर्ध्य-रुपी क्षण वाहित;
कारण......
पुढचा क्षण कसा येईल,कोणास काय माहित...!
चारुदत्त अघोर(२१/४/११)