"हेच ते जीवन…जे जगायला वेळ नाही."...चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, April 25, 2011, 12:09:30 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं,
"हेच ते जीवन...जे जगायला वेळ नाही."...चारुदत्त अघोर.
तान्हपण आहे,पण रांगायाला वेळ नाही,
बालपण आहे, पण हुंदडायला वेळ नाही;
इतकी खेळणी आहेत, पण खेळायला वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

इतके खाण्यास पदार्थ,जे अस्वादायाला वेळ नाही,
जलपानी हजारो रस,जे हुर्पायाला वेळ नाही;
गर्मीत थंडीची सोय,पण थंडावायाला वेळ नाही;
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

सुंदर पौगुंडीत दुनिया,पण स्वप्नायला वेळ नाही,
रसरशीत गुलाबि तारुण्य,जे रंगायला वेळ नाही;
प्रेयसी आहे पण,तिला शपथी भेटायला वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

उच्चपदी नौकरी आहे,पण पद गाजवायला वेळ नाही,
लठ्ठ पगारी आय आहे,पण खर्चायला वेळ नाही;
घर,गाडी,सुखसोयी आहेत,पण भोगायला वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

सखी बद्दल जीवापाड प्रेम,जे व्यक्तवायला वेळ नाही,
चुंबकीय आकर्षण आहे,पण एक व्हायला वेळ नाही,
कशी चुकून गोड बातमी आली,हे आनंदायला वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

सुंदर प्रपंच आहे,पण सौन्सारायला वेळ नाही,
कामा अंती,लेकराची तोतरी हाक ऐकायला वेळ नाही;
स्वतःच्या दिनचर्ये पुढे,मुलाशी खेळायला खेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

करमणूक आहे,पण हसायला वेळ नाही,
दुखः असलं तर, रडायला वेळ नाही,
पिडीताला घटकाभर, सांत्वनायला वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

वास्तविकते पुढे,भावनांना वेळ नाही,
दगड झालेल्या हृदयाला,पाझरायला वेळ नाही;
इतका स्वार्थी कसा झालो,कळायला वेळ नाही;
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

धनवान आहे पण, माणुसकी श्रीमंतायला वेळ नाही,
भौतिक रित्या प्रगतलो,पण आत्मा अध्ययनाला वेळ नाही;
रोज दुनिये करिता जगतो,पण स्वतःकरिता एक क्षण वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

देव मानतो, पण नमस्कारायला वेळ नाही,
कर्म मानतो, पण सौन्स्कारायला वेळ नाही;
स्वतः भिकारी कि राजा,हे ठरवायला वेळ नाही,
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.

कसं जीवन पुढावतं आहे, हे समजायला वेळ नाही,
वृद्धत्व कधी आलं,हे हि उमजायला वेळ नाही;
कसं आयुष्य अन्तावलं,हे पण आठवायला वेळ नाही;
हेच ते भांडवलिक जीवन,जे जगायला वेळ नाही.
चारुदत्त अघोर.(१/४/११)

gaurig