बैचैन

Started by kavitabodas, April 25, 2011, 02:59:50 PM

Previous topic - Next topic

kavitabodas

रात्र  वैरी हि  कशी रे ,आठवणींचे तुझे पिसे
  घालमेल  संपेचना हि , लाविलेस तू छंद कसे
   सुगंध वाऱ्याचाही  ,हल्ली बोचतो अंगास कसा
  करती बैचैन जीवाला  मिठीतला तो क्षण जसा
  दिसतही नाही रस्त्यामधली गर्दी धुंदीत तुझ्या
  ठेच लागते कुठेतरी मग, येते सत्यात पुन्हा
  दूर सारिले नाते आपुले, काय चुकले माझे कुठे
  भरकट णारे जीव दोन हे ,तू तिथे अन मी इथे
 
  कविता बोडस   

mahesh4812


kavitabodas


santoshi.world