असेल का ती थांबली, पाहात माझी वाट

Started by chetan (टाकाऊ), April 27, 2011, 10:24:05 AM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

असेल का ती थांबली, पाहात माझी वाट
सरली ती वाट आता, पुन्हा नाही गाठ

भासे खळखळ पैंजणांची, उंबर्‍याच्या आत
  जणू खळबळ सागराची, किनार्‍याशी गात
का उमटती मनात अजूनी, निनादत नाद

खुळात तिच्या अनवाणी, हिंडलो नभात
  अन चंद्राला घालून साकडे, तारका बनात
ते स्वप्न म्हणू की सत्य, माझा माझ्याशीच वाद

भासली ती उभी तिथे, लाजून मला पहात
अन भरल्या अधीर पोकळ्या, जणू हृदयात
का भासती आभास अजूनी, संपूनही साथ

चेतन र राजगुरु  :(


chetant087


"अन भरल्या अधीर पोकळ्या, जणू हृदयात
का भासती आभास अजूनी, संपूनही साथ"

--छान आहे :)