अनामिक ओढ

Started by शिवाजी सांगळे, March 12, 2025, 05:30:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अनामिक ओढ

इतक्यात आमची भेट झाली, न् नजरेला नजर भिडली
अचानक ही सांज झाली न् पाखरे घरट्याकडे निघाली

सळसळती कुंतल बटा या वाऱ्याने,जणू उसळती लाटा
भिरभिरती नजर माझी अशी का स्पर्धेत त्यांच्या गुंतली

गारवा भोवतीचा अंगभर शहारे असे काय देऊन जातो
विझवू नकोस दिप अंबराचा गाली तीच्या लाली आली

होत असता प्रथेनुसार, मिठी नभांची दूरवर क्षितिजाला
एक रांग समुद्र पक्षांची किनाऱ्याकडे संथ परतू लागली

खेळावे रंगात मावळतीच्या आणि सहवासात सखीच्या
वाळूला पण, ओलेत्या मऊशार, मखमली भूरळ पडली

करावे दुर्लक्ष म्हणता, या सांजेकडे न् तिच्या कडे सुध्दा
ओढ अनामिक कोणती? मला तीच्याकडे ओढू लागली

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९