प्रेम ?

Started by Rani27, May 10, 2011, 01:45:55 AM

Previous topic - Next topic

Rani27

प्रेमाच्या वाटेवरती मन उडतेय अजाणतेपणी
उडतोय फक्त गोंधळ भावनानाचा
प्रेम असते काय अजून नक्की कळलेच नाहीये
तरीही हवेहवेसे ते धुंद क्षण
जाणवतेय हळूच मागून येणारी ती आठवण
नेहमीचे तेच दिवस वाटतेहेत आता फुलपाखरांचे !!
ओल्या मातीचा तो सुंगंध वेडावून टाकतोय आता
हवेय काय जाणीव नाही याची अजून
तरीही मन मात्र फक्त पिंगा घालतेय
कुठे कुणाभोवती माहित असूनही नकार देतेय :)
नेहमीचाच  तो स्पर्श मोहरोवतोय मनाला आता
हो... अरे खरच का पडतेय मी प्रेमातच!!

mahesh4812

Premat padlyavar sarva jag sundar diste :-)