अधिकार

Started by किरण कुंभार, May 11, 2011, 02:47:17 PM

Previous topic - Next topic

किरण कुंभार

अधिकार

मी  म्हणत  नाही  कि  तू  माजी  हो
फक्त  म्हणणे आहे जशी आहे  तशीच राहा
माझा  हट्ट नाही  कि  तुझे  माझ्यावर प्रेम असू दे
हट्ट  आहे  इतकाच मनाच्या नदीवरील  तुझे  प्रतिबिंब  तसेच  राहू  दे

मला  माहित  आहे  कि  ते  डोळे  माझी वाट कधीच  बघत  नाही
पण  माझे  डोळे  तुझी  वाट मात्र कधीच  चुकवत  नाही
मला  माहित  आहे  कि  माझ्यामुळे  तुझ्या  चेहऱ्यावर हसू  कधी खुलून येत  नाही
पण  माझ्या  चेहऱ्यावरच्या  हसण्याला  तुझ्या  शिवाय कधीच शोभा  येत  नाही

तुझे  कान  कोणाच्यातरी  चाहुलीची  वाट  सतत पाहत  असतात
माजे  कान  मात्र  तुझ्याच  आवाजची  पारायणे सतत  करत  असतात
तुझ्या विचारांच्या गर्दीतला  मी फक्त एक चेहरा असतो
माझ्या विचारांची गर्दी मात्र तुझ्या चेहऱ्या भोवतीच असते

प्रयत्न मी केले कि  हे सर्व विसरायचे आणि  कान डोळे  बंद  करायचे
विचारांना  हि  वाऱ्यासोबत  बांधून  आता पुढे  निघायचे
पण  काय  करू मी माझ्या  विचारांना  आणि  या वाऱ्याला  जणू  दुसरा  रस्ताच  माहित  नाही
आखे  जग  फिरून  सुद्धा  यांना दुसरे  कोणी  आवडतच  नाही

आता  मात्र  ठरवले  इथून  आता  सर्व नवीन  सुरु  करायचे
कान  डोळे  आणि  मन  सर्वाना  समजवायचे
कि  माहित  आहे  तिच्या  हृदयावर  दुसऱ्या  कोणाचा  तरी अधिकार  आहे
पण  त्या  गोड  आठवणीतल्या  तिच्यावर फक्त  आपलाच  अधिकार  आहे


   किरण कुंभार

chetan (टाकाऊ)

आता  मात्र  ठरवले  इथून  आता  सर्व नवीन  सुरु  करायचे
कान  डोळे  आणि  मन  सर्वाना  समजवायचे
कि  माहित  आहे  तिच्या  हृदयावर  दुसऱ्या  कोणाचा  तरी अधिकार  आहे
पण  त्या  गोड  आठवणीतल्या  तिच्यावर फक्त  आपलाच  अधिकार  आहे


sarasssssssssssssssssssssssssssssssssssssss mitraaa


mastach

Raj007


Sandesh More

kharch re mitra khup chhan aahe


wa wa wa

किरण कुंभार

aabhari aahe tumachya sarvancha maji pahilich kavita aahe  :)

राहुल

great work Kiran...keep it up...

sanraj

Manatal lihilas mitra
suuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuunar

anolakhi

jinkales re mitraaaaaaaa.........ekedum manchla pataa underbomb.......

anolakhi


प्रयत्न मी केले कि  हे सर्व विसरायचे आणि  कान डोळे  बंद  करायचे
विचारांना    हि  वाऱ्यासोबत  बांधून  आता पुढे  निघायचे
पण  काय  करू मी माझ्या    विचारांना  आणि  या वाऱ्याला  जणू  दुसरा  रस्ताच  माहित  नाही
आखे  जग    फिरून  सुद्धा  यांना दुसरे  कोणी  आवडतच  नाही.....


kas barobar pakadales re manatale......

leenamorde

प्रयत्न मी केले कि  हे सर्व विसरायचे आणि  कान डोळे  बंद  करायचे
विचारांना  हि  वाऱ्यासोबत  बांधून  आता पुढे  निघायचे
पण  काय  करू मी माझ्या  विचारांना  आणि  या वाऱ्याला  जणू  दुसरा  रस्ताच  माहित  नाही
आखे  जग  फिरून  सुद्धा  यांना दुसरे  कोणी  आवडतच  नाहीup chan


kharach!!!

khup chan lihla ahe..