“आमरस....!!!”..…चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, May 13, 2011, 04:36:47 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"आमरस....!!!".....चारुदत्त अघोर.
आज नकळतच मला,लग्नाच्या पहिल्या वर्षी घडली गोष्ट स्मरली,
कशी कोण जाणे,सौन्सारी विचारात,हीच ध्यानीमनी उरली;
कारण,तो हि होता ऋतू कोरड्या रुक्ष ग्रीष्माचा,
कुलरच्या थंड झुळुकी,खस-गंधी रेशमाचा;
आठवतं? तू मला विचारलेलं आवडता ऋतू आणि फळ ,
मी उस्फुर्त पणे सांगितलेलं,आंबा आणि पानगळ;
दुसर्या सकाळी आपण लाँग-ड्राईव वर असता, तू एकदम बोलली थांबा...!,
मी कच कन ब्रेक मारीत बघितले,तू दाखवलास,खिडकी बाहेर विकता आंबा;
अगदी आनंदाने मी गाडी उभी करून,खरेदी बेतली,
रसरशीत पिकल्या आंब्याची,एक पेटीच घेतली;
घरी येताच त्यातला एक, रसरशीत आंबा मी निवडून वेचला,
पाण्या खाली धुवून-पुसून, तो हळुवार माचला;
अति भरला असल्याने त्याची, साल चिरून पिचकारी उडाली,
तुझ्या अंगावर सहजच उडून, त्या रसाने तू चेहेरी बुडाली;
आंबा हाथी आवरत, मी तुला मागून पकडले,
माझ्या रसाळ मिठीत, तुला आवळून जकडले;
रसल्या चेहेरी ओठ लावत,जरा वेगळाच रस चाखला,
आंबा पिळत तुज्या तोंडी,अझून रस माखला,
माखत असता,तू त्याला पकडण्याचा प्रयत्न फसला,
निसटून दोन मोठ्या आंब्यात,तो सहज जाऊन फसला;
वेडे केले त्या आंब्याने,जागवून आगळाच कामरस,
त्या दिवशी सारखा आजपर्यंत,खाल्लाच नाही आमरस....!!!
चारुदत्त अघोर.