एक रिकामी फ्रेम!

Started by pralhad.dudhal, May 14, 2011, 11:52:21 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

एक रिकामी फ्रेम!

माझ्या दिवा-स्वप्नातले घर.....
घराचा भला मोठा दिवाणखाना....
दिवाणखान्याच्या भिंतीवर......
लावली आहे एक आकर्षक पण.. रिकामी  फ्रेम......
या फ्रेम मधे काय लावू बरं?
...लावावा का फोटो स्वतंत्र भारतासाठी
शहीद झालेल्या
एखाद्या नरविराचा?
का लावावा आजच्या सत्ताधिशाचा?
पण नकोच!
लावावा तेथे फोटो....स्वतंत्र भारतात-
आत्महत्या कराव्या लागलेल्या
एका कर्जबाजारी बळीराजाचा?
पण त्याने काय होणार?
त्यापेक्षा ही फ्रेम रिकामीच ठेवावी!
कधीतरी त्यात लावता येईल फोटो.....
स्री-भ्रूणहत्त्येत सामील एखाद्या पांढरपेशा
नराधमाचा!......अथवा.....
माणूसकीला काळीमा फासून......
अगतिक माणसाच्या
अवयवांची तस्करी करणा-या-
क्रुरकर्म्याचा!
या फ्रेम मधे रंग भरीन म्हणतो.....
गद्दार देशद्रोहींच्या रक्ताचा!
....पण मी एक सामान्य नागरिक!
प्रत्यक्षात- फार तर फोटो लाविन तेथे...
त्या निर्मिकाचा....आणि...करेन पुजा मनोभावे....
देवा सर्वांना चांगली बुदधी दे!
मला मात्र सुखात ठेव!!
-प्रल्हाद दुधाळ. 9423012020.
www.dudhalpralhad.blogspot.com

amoul