तो फक्त बोलतो मी मधहोश होते

Started by amoul, May 16, 2011, 10:04:40 AM

Previous topic - Next topic

amoul

तो फक्त बोलतो  मी मधहोश होते,
त्याचे पडता मानेवरती उसासे मी बेहोश होते.

तो मंद मंद घालतो फुंकर अंगावरी,
बासरीचे सूर जणू उमटती अंतरी.
तो हलकेच स्पर्शतो ओठ गालांवरी,
मी मिटून घेते डोळे, पापणी नि पापणी.
तो सोडतो बंधनाची एक एक गाठ,
दुथडी वाहते नदी आणि ओलांडते काठ.
मी स्वाधीन असते त्याच्या, त्याचे त्यालाही न थांबवे,
वाटते कि मरावे आताच, आता जीवन तरी कश्यास हवे.
हेच क्षण मुक्तीचे आणि हेच पुन्हा अडकण्याचे,
इथेच मन उदासीन तरी मनी जल्लोष होते.
तो फक्त बोलतो मी मधहोश होते.

पुढे कोण जाणे कसे काय होते,
कशी रात्र सरते, कशी पहाट होते.
पहाटेच्या थंडीतही अंगावर त्याच्या बाहोस घेते.
पुन्हा हळूच घालतो तो फुंकर कानी,
सळसळ जाणवते सुकल्या पानांत आणि,
टच्च दंश होतो गोऱ्या गोमट्या गाली,
वार्यासंगे हेलकावे, घेत यावे पान खाली,
अवस्था तशीच असते माझी,
मी लाज विसरून राजरोस होते,
तो फक्त बोलतो मी मधहोश होते.

बंद डोळे, बंद ओठ, आवेग धुंद धुंद,
मिटले  मिठीत जीव पुन्हा कोणते ना बंध.
कसलाच ना भाव उरला, सार्यात संतोष होते.
रातीस निजताना मी नि  कळी सारखीच असते,
वाऱ्याची जादू अशी कि मी हि फुलते ती हि फुलते.
आता मी मोकळी आहे पूर्वी भोवती कोश होते.
तो फक्त बोलतो मी मधहोश होते.

...अमोल

sanjiv_n007

Apratim....

रातीस निजताना मी नि  कळी सारखीच असते,
वाऱ्याची जादू अशी कि मी हि फुलते ती हि फुलते.
आता मी मोकळी आहे पूर्वी भोवती कोश होते.
तो फक्त बोलतो मी मधहोश होते.

Ya shevtcha pankti khup chaan aahet.

charudutta_090

amoul,......tujhi kavita ani tu kharach mala sudha madhosh kele...Its really provoking....to get on fr the "night riders"...pudhe kaay bolu.????????????????

nitin_9340

मी स्वाधीन असते त्याच्या, त्याचे त्यालाही न थांबवे,
वाटते कि मरावे आताच, आता जीवन तरी कश्यास हवे.
हेच क्षण मुक्तीचे आणि हेच पुन्हा अडकण्याचे,
इथेच मन उदासीन तरी मनी जल्लोष होते.
तो फक्त बोलतो मी मधहोश होते.

काय कविता केली...शब्दच नही ...सुरेश भट आटवले ...अप्रतिम !

santoshi.world