आदरांजली - जगदीश खेबुडकर

Started by बाळासाहेब तानवडे, May 18, 2011, 09:38:29 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


आदरांजली - जगदीश खेबुडकर

कोण्या हत्येने तुमचे घर काय जळले.
तयातुनच तुम्हा पहिले काव्य स्फुरले.
आशयघन काव्याचे सतत उधळले रंग.
मराठी मन आपल्या गीतात झाले दंग.

आकाशवाणीने घेतली तुमची दखल.
वसंत पवारांनी केले सिनेमात दाखल.
मिळाल्या संधीचे तुम्ही सोने हो केले.
सिनेमास लोकप्रिय गीतकार जे दिले.

लावणीकार म्हणून नाव प्रसिद्ध झाले.
तरी विविध गाण्यात सारे भाव आले.
आपली नवी असो वा गीत रचना जुनी.
कर्णमधुर अन अवीट आहेत सारीच गाणी.

कधी निर्माता ,दिग्दर्शक सांगे प्रसंग.
कधी संगीताच्या धूनेच ऐकून अंग.
सुंदर गीतास गोड रूप तत्काळ दावी.
कोल्हापूर नगरीचे,नाना तुम्ही शीघ्रकवी.

रसिकास दाविला प्रतिभेचा अविष्कार.
कलेच्या सेवेत झाला सारा जन्म साकार.
गुरु लाभले ऋषीतुल्य ग.दि.माडगूळकर
शोभे शिष्य तुम्ही गीतकार जगदीश  खेबुडकर.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १८/०५/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
 

amoul

Khup khup chhan kavita tyahun chaan aadaranjali.

khup dhanyawad Shri Balasaheb. kharach khup dhanyawad

बाळासाहेब तानवडे

अमोल , Intense अभिप्रायाबद्दल खुप खुप धन्यवाद....