आयुष्यातील काही क्षण ...

Started by aryanbhv, May 19, 2011, 10:07:21 PM

Previous topic - Next topic

aryanbhv

आयुष्यात काही क्षण असेही येतात ..............

ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही
अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी

कधी रक्ताची नातीही नकळत तुटतात
तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात

कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात
तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात

आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत
अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत

कधी जन्मभर साथ देऊनही माणूस नाही कळत
तर कधी क्षणातच अनोळखीही दाखवतो आपली ओळख

कधी सोबत असूनही प्रेम आटते
तर कधी विरहहि संगमाप्रमाणे भासते

इथे लोक माणसांपेक्षा दगडांवर खर्च करतात
नंतर बाराव्याचे जेवणही समारंभपूर्वक देतात


PRASAD NADKARNI


chetant087

अगदी खरं...

छान कविता.. लिहत राहा :)