मन वेडे हे भरकटले पुन्हा आज...

Started by stupid.phoenix, May 20, 2011, 10:29:52 AM

Previous topic - Next topic

stupid.phoenix

मन वेडे हे भरकटले पुन्हा आज,
धावले सुसाट ऐकण्या तोच आवाज.
पाऊस सरींसवे कोसळले होऊन बेभान,
क्षणात तृणपात्यावर विसावले हरवून सारे त्राण.
रवि किरणांसवे उजळून झाले तेजोमान,
वाऱ्यावर सवार होत विखुरले,होऊन निष्प्राण.
दमून थांबले शेवटी तुझ्याचपाशी,
चाहूल घेण्या तुझी धुंडाळे पुन्हा त्याच वेशी.
घुटमळत थांबले आज पुन्हा त्याच रस्त्यावरि,
दूरदूर नजर फेके शोधण्या,अंतरि हुरहुरी.
संकेतस्थळावरुन हताश एकलेच परतले,
न येणार कुणी सांत्वनास,सत्य हे सले.
हळुच बघी ते जखमा केव्हाच्या लपविलेल्या,
सर्वास अनभिज्ञ ज्या,मर्मावर झलेल्या.
पाणावल्या कडा आज पुन्हा त्या आठवनींने,
कंठ दाटला पुन्हा त्याच वेदनेने.
हळवे होऊन बसले,छळे त्यास कातरवेळ,
कुठे चुकलो,का दुखलो?गतकालाचा बसे न मेळ.
रात्र होताच गडद त्यात अलगद विरुन जाई ते नाराज,
मन वेडे हे भरकटले पुन्हा आज.....