कधी कधी येते का ग माझी आठवण

Started by manoj vaichale, May 20, 2011, 08:16:11 PM

Previous topic - Next topic

manoj vaichale

आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या ग अश्रू मधून
कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून

कधी कधी येते का ग माझी आठवण............ ....
आठवतात का तुला कधी ते क्षण............ .......

घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ग
आणि घालवू शकलो नाही क्षण जे सोबत

कधी कधी येते का ग माझी आठवण............ ....
आठवतात का तुला कधी ते क्षण............ .......

पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार
विचारात त्या लक्ष न लागे कधी मग जेवणावर
जेवताना ग कधी तो घास अडे का ओठांवर
आणि डोळ्यातून वाहते का ग अश्रूंची धार

कधी कधी येते का ग माझी आठवण............ ....
आठवतात का तुला कधी ते क्षण............ .......

फिरता फिरता थांबतेस का कधी त्या जागी येऊन
ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून
कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून
तुझी नजर चहू ओर कोणी बघेल म्हणून

कधी कधी येते का ग माझी आठवण............ ....
आठवतात का तुला कधी ते क्षण............ .......मनोज