प्रेम हे प्रेम आहे..चारुदत्त अघोर(२६/५/११)

Started by charudutta_090, May 26, 2011, 06:49:45 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
प्रेम हे प्रेम आहे..चारुदत्त अघोर(२६/५/११)
किती प्रगल्भित हे,अडीच अक्षर आहे,
नाही बघत कोण अडाणी,कोण साक्षर आहे;
कधी,कुठे,कोणावर होईल,काय नेम आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

हळुवार असलं तरी आत्मिक रित्या शक्तिमान आहे,
ओघीत असलं तरी,नैतिक रित्या नीतिमान आहे,
यात कसलं स्थैर्य वा काय क्षेम आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

कायम ज्यात विरह करावा लागतो सहन,
बोलता माणूसही,विचारात पडतो गहन;
मिळालं वा नाही मिळालं,तरी अश्रुन्वित थेंब आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

ज्यात दिवस जातो तंद्रीत आणि रात्र जाते जागीत,
ज्यात काहीच ठाम नसते, स्वतःचेच भागीत;
निव्वळ ठोक ताळ्यावर,सर्व काही जेम तेम आहे ;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

मानलं तर सदैव, हुकुमी एक्का आहे,
जिंकतो तो ज्याचा, इरादा पक्का आहे;
पत्त्यांनाही मागे टाकणारा हा,आगळाच गेम आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.
चारुदत्त अघोर(२६/५/११)





Purohit.joshi

NICE!!!!!!!!I like it!!!!!!

नाही बघत कोण अडाणी,कोण साक्षर आहे;
कधी,कुठे,कोणावर होईल,काय नेम आहे;
सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.