प्राक्तन

Started by राहुल, May 27, 2011, 09:58:26 PM

Previous topic - Next topic

राहुल

प्राक्तन     

तिचं नसूनही असणं 

माझ असूनही नसणं     

अशक्य हे जीवन 

तिच्यावाचून जगणं 

ठेवावे लागते तरीही 

चेहऱ्यावर असह्य हसणं 

जड जात चारचौघात वावरणं 

विरता विरत नाही दुखणं   

आता फक्त शब्दांचे खेळ मांडणं 

विरहात तिच्या क्षणोक्षणी हरवणं 

अनोळख्या वाटेवर एकांती फिरणं 

तिच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर रमण 

आता माझ असणं नसणं   

जीवन जगणं, हसून वावरणं 

दुखणं मांडणं, हरवून फिरणं   

उरलं मात्र फक्त     

प्राक्तनात रमण     

प्राक्तनात रमण