पावसाच्या सरी....

Started by Tinkutinkle, June 02, 2011, 08:48:13 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

पावसाच्या सरी
याव्या माझ्या घरी
व्हावे ओलेचिँब अन्
धुंद या अवसरी
.
मातीचा सुगंध
दरवळावा असा
जणु आकाशी विहरणारा
मुक्त पाखरांचा थवा
.
मेघ यावे दाटूनी
विज जावी कडाडूनी
.
वाढावा पावसाचा वेग
भिजावी अवनी सारी चिँब
.
बेभान व्हावे पाहताना
निसर्गाचे
हे विलोभनीय दृश्य
.
ओसरता ओसरता
पावसाने देऊन जावे
एक छानशे इंद्रधनुष्य 

-ट्विंकल देशपांडे

amoul