ऋतूबदल

Started by amoul, June 03, 2011, 09:56:26 AM

Previous topic - Next topic

amoul

हा कसा निसर्गात अचानक झाला बदल,
गाऊ लागला गीत वारा,बरसले आकाश होऊन जल.

कुठून गंध उठला मातीच्या कणाकणात,
रोमांच उठला शरीरी,हर्ष दाटला मनामनात.

या पूर्वी ना भासली सांज अशी अनोळखी,
पूर्वी कधी ना पहिली भिजणारी सांजसखी.

पान-पान ओले ओले, थेंब थेंब नवा नवा.
नवी जादू ओलाव्याची आणि किमया दावी गारवा.

भय उष्माचे इथवरले दूर कुठूनसे विरून गेले,
निसर्गाचे गारुड नवे ऋतू बदलाचे फिरून गेले. 

....अमोल

Tinkutinkle