निर्विकार.....

Started by Tinkutinkle, June 03, 2011, 12:15:32 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

कुठेतरी एक ठिणगी पडते,
ठिणगीचं रूपांतर आगीत होत,
कुणाचं तरी घर जळत,
कुणी अनाथ होत,
कुणी इतक्या वर्षांच्या जपलेल्या
आठवणी गमावून बसतं,
तर कुणी आपलं सर्वस्व हरवून बसतं,
पण आपल्याला त्याच काहीच नसतं!

निर्विकार चेहऱ्‍याने आपण बातमी बघतो,
'तीच तीच बातमी काय दाखवतात'
असं म्हणून चँनल बदलतो,
आपलं ते नेहमीचं सिरील लावतो,

त्या सिरीअल मधली माणसं ओळखीची असतात,
खोटी असली तरी जवळची वाटतात, 

त्यातल्या त्या लाडक्या नायिकेवर
संकट ओढवलेलं असतं,
तीला रडताना पाहून मन हेलावून जातं
आपण दर दोन मिनीटाला खंत व्यक्त करताना,
खलनायकाला दोन चार शिव्या झोडतो,

त्याच वेळी तिकडे खरोखर
कुणाचंतरी घर उध्वस्त होतं,
कुणीतरी खरोखर रडत असतं
पण त्याच आपल्याला काहीच नसतं!

सिरीयल संपते,
आता काय होणार बिचारीचं असं म्हणून,
चँनल सर्फ केला जातो,
अजूनही तीच बातमी चालू आहे,
छोटी आग आता भीषण झाली आहे,

त्या निर्विकार चेहऱ्‍यावर
रागीट भाव उमटतात,
'त्यात काय एवढं,
ह्याच्याकडे दुसऱ्‍या बातम्या नाहीत का?'
असं म्हणुन टि.व्ही बंद होतो.
एक छानशी जांभई देऊन,
आपण स्वप्नांच्या दुनियेत विसावतो,
स्वप्ने असतात उद्याची,उज्वल भवितव्याची,

पण तिकडे मात्र कुणीतरी
आपल्या वर्तमानात भविष्याला
हरवून बसलेला असतो,
स्वप्नं तर लांबची गोष्ट
आता आपलं काय होणार
या चिंतेने जागा राहीलेला असतो,
त्याच होतं नव्हतं सारं खाक झालेलं असतं,
पण आपल्याला त्याचं काहीच नसतं!!

हं, खरच म्हंटलय कुणीतरी
ज्याच जळत त्यालाच कळतं.


-ट्विंकल