“झाकालंच नाही तर, उघडायची मजाच काय”..........? चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, June 04, 2011, 09:00:19 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"झाकालंच नाही तर, उघडायची मजाच काय"..........? चारुदत्त अघोर.(४/६/११)
तुझी ग्लेमरची आवड मी समजू शकतो,
फ़ेशनेबल जगात राहायचं कसं,हे हि उमजू शकतो;
एक एक उच्च ब्रांड,जुळवतात आगळीच फ्रेज,
इतकी गं कशी तुला या आधुनिकतेची क्रेज;
नुसता भडक दिखावा आणि खोकली स्टायील,
फोने वाजालाही नाही तरी,लावा कानी मोबायील;
इंग्रजी आलं नाही तर म्हणायचं, ओ माय गुआड,
वापरायची अक्कल शून्य असली तरी,असावा आय पुआड;
पाय मुरगळला तरी हवी, पायाखाली हाय हिल,
मग पैसे कितीही लागले तरी,भर डॉक्टरांचे बिल;
वासनिक  वृत्तीच्या मित्रान- बरोबर करायचे नायटिंग,,
इंच भर वाढायला नको म्हणून, करायचे डायटिंग;
मग एटिकेट्स म्हणून ड्रिंक्स करून,बनायचं पब्लिक प्रोपर्टी,
वेडा वाकडा प्रकार झाला कि,कोणाचं पाप याची नाही गेरेनटी;
म्हणून सांगतो ऐक...
आपली सौन्स्कृती हीच खरी,प्रगल्भित परंपरा,
झाकलं सौंदर्य,जणू लाक्षिमी,सरस्वती श्वेतांबरा;
जिला आजही मिळतो जगी, मानाचा मुजरा,
उत्तुंग काव्य रचवतो,केशी मळलेला गजरा;
वेडे वाकडे कट्स ला लाजवते, एक लांब सरळ वेणी,
घायाळ करते प्रियकरास,काजळीत नजर पापणी;
तिच्या येण्याची चाहूल नेहेमी ठेवते,सख्यास कोंदण,
आजन्म पदरी बांधते,नाजूक पाउली झ्न्करीत पैंजण;
जिच्या विचारीच,नैसर्गिक निर्गुण निरंकार,
पृथ्वी तलावर जिचा, लाज हाच अलंकार;
म्हणून सर्व जगी भारतीय नारी,हि उच्च पारडिच बसते,
जी उत्सुकता झाकण्यात आहे,ती दाखवण्यात नसते.;
बिना फुल-वाती दिव्याची,रात पूजाच काय,
काही झाकालंच नाही तर,उघडायची मजाच काय..........?
चारुदत्त अघोर.(४/६/११)