“पचमढी ट्रीप” चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, June 09, 2011, 11:19:27 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"पचमढी ट्रीप" चारुदत्त अघोर.(९/६/११)
आपली लग्नानंतरची पहिली ट्रीप,पचमढी,
नको म्हंटल तरी घातलीस साडी,जपण्यास रूढी,
ज्यांनी तुलाच खूप जड होत होतं,
मला मात्र उडत्या तारामबळी, हसू येत होतं;
त्या उंच चौरागढच्या पायर्या,चढत मी पुढे तू मागे,
मी हाथ पकडावा म्हणून,तुझे विनाव्ण्याचे नाजूक धागे;
आज वीस वर्ष नंतर,पुन्हा त्याच पायर्यांवर आपण चढतोय,
फरक इतकाच,तू जीन्स घालून पुढे गेलीस,मी मात्र स्वतःस ओढतोय;
कुठे ती लाजरी,साडीतली तू,आज पूर्णपणे,झालीस बिनधास्त ,
मी मात्र तिथल्या तिथेच आहे, न कमी न जास्त,
त्या स्पोट वर एकदा ओरडून दहादा ऐकू येण्यास, तू घसा कोरडलीस,
पण ऐकून खूप छान वाटलं,कि ओरडताना न विसरता माझंच नाव घेऊन ओरडलीस.
त्या जुन्या स्मृतींची आठवण,जी काळ ओघी होति थोडी भंगली,
पण पुन्हा त्या "इको"झाल्या माझ्या नावाने,पचमढी ट्रीप अझूनच रंगली...!!
चारुदत्त अघोर.(९/६/११)
 



gaurig