'मराठी' खरी गरज

Started by शिवाजी सांगळे, April 18, 2025, 10:42:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

'मराठी' खरी गरज

मराठी मुंबई अगोदर खाली झाली
होऊन फितूर, कैवारी शांत बसले
आता तर मागोमाग भाषा निघाली
कैवाऱ्यांना ना सोयरसुतक कसले

येऊ देत हिंदी, येऊ देत गुजराती
इंग्रजी बोडक्यावर बसलीच आहे
आम्ही सर्वकाही, मुकाट भोगतो
सहन करणे आमच्या रक्तात आहे

कुणीही येवो, इकडे कुणीही राहो
आम्ही पोळी शेकून घेतली आहे
परक्यांनाच मराठी सक्तीची करा
त्यांनाच, महाराष्ट्राची गरज आहे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९