अबोल शब्दः तुझे आणि माझे .........

Started by neeta, June 09, 2011, 03:48:21 PM

Previous topic - Next topic

neeta




वर्षा मागून वर्ष सरत गेली
तुझे शब्द अजून अबोल राहिले
आता या शब्दांची आतुरता उरली नाही
मनात माझ्या तुझ्याबद्दलची ती भावना उरली नाही

उगाच चुकीच्या विचारांनी घर बांधले होते
विचाराचे हे घर आता पूरग्रस्त झाले होते
आलेल्या या पुरला कारण आहे कोणाचे ?
आहे तुझ्या अबोल शब्दाचे आणि माझ्या आपेक्षेचे

अपेक्षेचे वजन आता मला पेलवत नाही
आता माझ्या मनात काही विचार येत नाही
अपेक्षेने काही साध्य होत नाही ,
आता कळले, पाहिजे ते आपल्याला मिळतेच असे नाही

आता मी माझ्या साठी जगणार आहे
कर्तव्य भान आता मी ठेवणार आहे ,
नको मला आता तुझे शब्दः
आता मी अबोल होणार आहे .........

{निता}
23/02/2010