न कळत.......

Started by neeta, June 09, 2011, 03:50:33 PM

Previous topic - Next topic

neeta

न कळत.......

न कळत जवळ केले होते , माहित नव्हते सवय लागेल
सवयीचा हा प्रवाह , गरज बनून वाहू लागेल ,

गरज आहे आता त्याची , पण त्याला आजून वेळ आहे ,
घरच्यांचे कारण सांगतो , म्हणतो हाच तर खरा खेळ आहे ,

घरच्यांना सुनेपेक्षा , मोलकरीण हावी आहे ,
घरच्यांची हि अपेक्षा , माझ्यासाठी नवीन आहे ,

आपल्या गरजेचा प्रवाह , प्रेमाचे रूप धरण करत आहे ,
प्रेमच आता , आपले जीवन बनत आहे ,

प्रेमाचा अपमान माझ्याकडून होणार नाही ,
बायकोला , मोलकरीण बनवणे मला तरी जमणार नाही ,

आपले प्रेम या जन्मी तरी शक्य नाही ,
आणि तुला दुखावल्या बदल माझा पुढील जन्म नाही ,

कर्तव्यासाठी खारे पाणी प्यावे लागते ,
आलेल्या दुखाना सहज गिळावे लागते ,

शेवटचा श्वास घेत , मला हेच समजवून गेला ,
आणि जाता - जाता माझ्या हृदयाची चावी घेऊन गेला .......


निता.........

gajanan.chaudhary

कर्तव्यासाठी खारे पाणी प्यावे लागते ,
आलेल्या दुखाना सहज गिळावे लागते
Kharach aahe

vinodvin42

आपले प्रेम या जन्मी तरी शक्य नाही ,
आणि तुला दुखावल्या बदल माझा पुढील जन्म नाही ,

nice line neeta.................. :)

dip.chikhale12@gmail.com

न कळत जवळ केले होते , माहित नव्हते सवय लागेल
सवयीचा हा प्रवाह , गरज बनून वाहू लागेल .........???????

Akky



sheetal.pawar29

प्रेमाचा अपमान माझ्याकडून होणार नाही ,
बायकोला , मोलकरीण बनवणे मला तरी जमणार नाही

कर्तव्यासाठी खारे पाणी प्यावे लागते ,
आलेल्या दुखाना सहज गिळावे लागते

manatale gupit othiya g aale...
tyachyasathi matr manich rahile...

प्रशांत

कर्तव्यासाठी खारे पाणी प्यावे लागते ,
आलेल्या दुखाना सहज गिळावे लागते

nice one

jayashri321


Nitesh Joshi